महाराष्ट्रातील साखर उद्योग

कृषी क्षेत्रामध्ये शेतक-यांच्या उत्पन्नात साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा असतो. साखर उत्पन्नाबाबत 33% उत्पादनासह जगात ब्राझील प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भारत 16%, चीन 9%, थायलंड 6%, मेक्सिको 4% तर, इतर देशांतील साखर उत्पन्नाचे एकत्रित प्रमाण 32% इतके आहे. देशात साखर उत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा सर्वांत मोठा (35%) वाटा आहे. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रांतर्गत साखर उद्योगाने कृषी अर्थकारणात मोठी मजल मारली आहे.

ऊसविकास योजना-साखर आयुक्तालय

भारतातील एकूण साखर उत्पादनापैकी 1/3 उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. सन 2010 -11 मध्ये राज्यात 10.22 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. सन 2011-12 मध्ये हे क्षेत्र 10.43 लाख हेक्टर इतके वाढले, रज्यातील वाढलेले ऊसाचे क्षेत्राच्या प्रमाणात ऊसाची तोडणी आणि वाहतूक यासाठी लागणा-या वाढील यंत्रणेची आवश्यकता.